उमरगा :- तालुक्यातील नारंगवाडी येथील एकाने व्हॉटसअपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने दि.20 रोजी नारंगवाडी पाटीवर सामाजिक तणावपूर्ण वातावरण बनले होते. या घटनेची माहिती उमरगा पोलीसांना मिळता क्षणी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन,तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणून, संपूर्ण घटनेच्या सखोल माहिती अंती, आंदोलन करत्यांना विश्वासात घेऊन,संबंधितास पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर नंतर चार तास करण्यात आले रास्ता रोखो आंदोलन शिवप्रेमींनी मागे घेतले.
या घटनेत सामाजिक सलोखा जीवंत ठेवण्याकरीता नारंगवाडीकरानी जो मनाचा मोठेपणा दाखवला आहे. तो कौतुकास्पद असून, नारंगवाडीकरांचा आदर्श महाराष्ट्रातील तमाम जनतेने घेण्याची आज घडीस अत्यंत गरज आहे.
घटनाक्रम सविस्तर, नागपूर येथील घटनेची धग अद्याप संपली नसतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे एकाने वादग्रस्त फोटो व्हाट्सअप स्टेटस वर ठेवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे हिंदू संघटना आक्रमक होवून उमरगा – लातूर मार्गावरील नारंगवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोमुळे मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प राहिली. आंदोलकांनी समाजकंटकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) सदाशिव शेलार,उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यानीं आरोपीच्या अटकेची मागणी केली . दरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिशय संयमाने हाताळल्याने तीन तासानंतर आंदोलन करत्यांनी रास्ता रोको मागे घेतले. उमरगा पोलीसांनी संबंधित घटना तात्काळ नियंत्रणात आणून सामाजिक सलोख्यात होणारा मोठा अनर्थ टाळण्यात जी भूमीका पारपाडली ती अप्रतिम, अतुलनीय, कौतुकास्पद आहे,यात शंका नाही. याकरीता उमरगा टाईम्स परीवाराच्यावतीने उमरगा पोलीस विभागास एक सॅल्युट करण्यात येते. व भविष्यात ही आपण सर्व जण चांगली कामगीरी करुन नाव लौकिक करावे,ही या क्षणी शुभेच्छा.
परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले यांच्या मार्फत करण्यात आले आहे.