लोहारा :- रमजान ईद व इतर सण – उत्सव हे शांततेत व जातीय सलोखा राखून साजरे करावे, तसेच नागपूर येथील घडलेल्या घटने बाबत व सोशल मीडियावरील प्रसारीत होणाऱ्या अफावर विश्वास ठेवू नये, असे आवाहान उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविभाग उमरगा) सदाशिव शेलार यांनी केले. आगामी काळात येणारे रमजान ईद व इतर सण – उत्सव अनुषंगाने लोहारा शहरातील पोलीस ठाण्यात दि.22 मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी (उपविभाग उमरगा) सदाशिव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक पो.नि.ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा तालुक्यातील सर्व मस्जिदचे मौलाना तसेच शांतता व मोहल्ला कमिटीतील सदस्य यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पो.नि.ज्ञानेश्वर कुकलारे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, आगामी काळात होणारे, सण, उत्सव, सर्वांनी शांततेत साजरे करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहान केले. या बैठकीस उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उप प्रमुख शब्बीर गवंडी, ठाकरे गट शिवसेना ठाकरे तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक आयुब शेख, ठाकरे गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, महेबुब गवंडी, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ लोहारा तालुकाध्यक्ष तानाजी माटे, शफिक जमादार, हरी लोखंडे, नगरसेवक आरिफ खाणापुरे, पेशमाम शमशोद्दीश शेख, नयुम सवार, पोलीस अंमलदार आकाश भोसले, पोलीस अंमलदार माधव कोळी, पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे, पोलीस अंमलदार निरंजन फुलमाळी, तालुक्यातील पोलीस पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.