वडगांव गां येथील शेतकरी तथा भजनी मंडळातील गायक कै.बाबुराव एकनाथ फुलसुंदर (माळी) यांचे अल्पशा आजाराने निधन

0
41

 

लोहारा :-  तालुक्यातील वडगांव गां येथील शेतकरी तथा भजनी मंडळातील गायक कै.बाबुराव एकनाथ फुलसुंदर (माळी) (वय 75) यांचे दि. 21 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, बोलका होता. सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, गोरगरिबांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे बाबुराव फुलसुंदर यांना सर्वत्र *आबा* या नावाने ओळखले जात होते. अंत्ययात्रा 6 वाजता झाली. यावेळी त्यांच्या कार्यामुळे खूप मोठा जनसमुदाय जमा झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 2 मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते नागेश फुलसुंदर यांचे वडिल होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here