लोहारा :- तालुक्यातील कानेगाव गटाची भाजपा संघटन पर्व बूथ समिती गठन बैठक दि.24 मार्च 2025 रोजी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, विस्तारक तथा प्रवाशी कार्यकर्ते सिद्धेश्वर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, पंचायत समिती माजी सदस्य ज्ञानेश्वर परसे, युवा मोर्चा सरचिटणीस सुयश दंडगुले, प्रसिद्धीप्रमुख निकेश बचाटे आदी उपस्थित होते. यावेळी संजय कदम, बालाजी कदम, योगेश संगशेट्टी, शिवाजी पवार, रोहित सिरसाट, परमेश्वर कदम, हरिदास पवार, दत्तात्रय सलगरे, परमेश्वर कदम, ज्ञानेश्वर मोरे, रवी भोंडवे, बाबा गर्जे, दादा जगताप, स्वदेश फत्तेपुरे, डॉ.सत्यवान गोरे आदींची बूथ प्रमुख म्हणून निवड करुन सर्वांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कानेगांव गटातील सर्व बूथ समितीचे गठन करण्यात आली. भातागळी व कास्ती गावातील अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.