कोरेगाववाडी येथील शिवाई शैक्षणिक संकुलात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0
108

 

उमरगा :-  तालुक्यातील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, कोरेगाववाडी येथे  दि.24 रोजी  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सचिव उमरगा शहरातील प्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉ. विजय बेडदुर्गे, धाराशिव येथील क्षयरोग तंत्रज्ञ श्रीराम चौधरी होते. उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे क्षयरोगाबद्दल जनजागृती केली. श्रीराम चौधरी यांनी क्षयरोग रोगाची लक्षणाबद्दल माहिती दिली.सक्रिय टीबी असलेल्या व्यक्ती खोकल्यावर, शिंकल्यावर, बोलल्यास, गाताना किंवा हसताना टीबी पसरू शकतो. तसेच क्षयरोगाशी लढा देण्याकरिता शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरियामुळे टीबी होतो. हे जंतू हवेतून पसरतात आणि जेव्हा तुम्ही ते श्वासाने आत घेता तेव्हा ते तुमच्या फुफ्फुसांना संक्रमित करू शकतात.दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ तीव्र खोकला, छातीत दुखणे, खोकल्यामुळे रक्त किंवा थुंकी येणे, थकवा किंवा अशक्तपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे, थंडी वाजून येणे, ताप, रात्री घाम येणे क्षयरोगाची लक्षणे आहेत.थुंकी आणि फुफ्फुसातील द्रवपदार्थाच्या प्रयोगशाळेतील चाचण्या, छातीचा एक्स-रे, संगणकीय टोमोग्राफी स्कॅन करून घ्यावेत. वेळेवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधे वेळेवर आणि नियमित घ्यावीत. ‘ प्रत्येक श्वास मोलाचा, प्रसार थांबवा क्षयरोगाचा’ हा आरोग्य मंत्र डॉ.विजय बेडदुर्गे यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमामध्ये पार्वतीबाई कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर व हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग, अकोले हे महाविद्यालय झूम मिटिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख, प्रा.औदुंबर जाधवर, प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.निलोफर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.मोनिका धुरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here