धाराशिव जिल्ह्यातील पहिले डिजिटल QR Code लायब्ररी असलेले तहसील कार्यालय उमरगा 

0
227

 

उमरगा :-  धाराशिव जिल्ह्यातील पहिले डिजिटल QR Code लायब्ररी असलेले तहसील कार्यालय म्हणून तहसील कार्यालय उमरगा उल्लेख केला जात आहे. सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंतर्गत कार्यालयीन सोयी सुविधा/नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या डिजिटल लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. प्रकाशन दिनांक: 23 मार्च 2025 तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी  गोविंद येरमे यांच्या हस्ते या लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक धाराशिव जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी  किर्ती किरण पुजार (भा.प्र.से) असून, उपविभागीय अधिकारी उमरगा  गणेश पवार आणि तहसीलदार उमरगा  गोविंद येरमे यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले QR Code डिजिटल लायब्ररीची संकल्पना मांडून प्रत्यक्षात विकसित करणारे संगणक अभियंता . डी. बी. सलगर यांनी या लायब्ररीच्या माध्यमातून नागरिकांसाठी डिजिटल वाचनाची सुविधा निर्माण केली आहे.

लायब्ररीतील प्रमुख सुविधा:

✅ ई-वृत्तपत्रे: मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील 46 वृत्तपत्रांचे मोफत वाचन

✅ सायबर सिक्युरिटी ब्लॉग: इंटरनेट सुरक्षेवरील मार्गदर्शनात्मक लेख ,तंत्रज्ञानाच्या युगात सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. याच दृष्टीने तहसील कार्यालय, रेणापूर येथे G20 सायबर सिक्युर अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत ‘सायबर सिक्युर वॉल’ स्थापन करण्यात आली आहे.

️ ही वॉल QR Code बेस तंत्रज्ञानावर कार्यरत आहे आणि नागरिकांना विविध सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी मदत करेल.

 

सुरक्षित इंटरनेट वापरासाठी उपलब्ध विषय:

✅ Wi-Fi Security

✅ Online Security

✅ ATM Security

✅ Cyber Security

✅ Data Security

✅ SIM Cloning

✅ Aadhaar Payment Security

✅ Browser Security

✅ Virus Security

✅ E-mail Security

✅ Cyber Bullying Protection

✅ Payment Security

✅ Spear Phishing Awareness

✅ महसूल विषयक ई-बुक्स: महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाची पुस्तके, प्रसिद्ध लेखक महसुल मित्र श्री. मोहसिन शेख यांच्या पुस्तकांसह

✅ 5000+ ई-बुक्स: कथा, कादंबरी, इतिहास, माहिती, धार्मिक, विनोद, प्रवास वर्णन, नाटके आणि ऑडिओ स्वरूपातील पुस्तके

✅ MPSC तयारीसाठी ई-बुक्स: स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचा समावेश

✅ ई-सरकारी नोकरी माहिती: शासकीय नोकऱ्यांचे जाहीरनामे आणि अभ्यासक्रम

✅ ई-ऑनलाइन क्विझ: AI टेक्नॉलॉजीद्वारे प्रत्येक जयंतीनुसार अद्ययावत होणारी क्विझ प्रणाली

या उद्घाटन सोहळ्यास नायब तहसीलदार (सं गां नि यो).रतन काजळे , नायब तहसीलदार ,भिमाशंकर बेरुळे ,अमित भारती ,मंडळ अधिकारी, तलाठी ,सर्व महसुल सहायक ,सहायक महसूल अधिकारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

तहसीलदार  गोविंद येरमे यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “QR Code डिजिटल लायब्ररी तहसील कार्यालयातील नागरिकांसाठी माहितीचा खजिना ठरेल. डिजिटल युगातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”या उपक्रमामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना महसूल विषयक माहिती सहज आणि मोफत उपलब्ध होणार आहे. तसेच, डिजिटल माध्यमातून ज्ञानसंपन्न होण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here