उमरगा :- रमजान ईद सणानिमित्त ईदगाह मैदान, उमरगा येथील सामूहिक नमाज पठणानंतर उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शहरप्रमुख योगेश तपसाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, शरद पवार, माजी नगरसेवक बालाजी तात्या सुरवसे, शेखर घंटे, गुंजोटीचे माजी सरपंच सहदेव गायकवाड, तालुकाप्रमुख विनोद कोराळे, व्यंकट पाटील, शेखर पाटील, नाना मदनसुरे, अरुण जगताप, मनोज जाधव, संदीप चौगुले, अमर शिंदे, राहुल शिंदे, संदीप चव्हाण, प्रदीप शिवनेचारी, निवृत्ती पवार, हरी भोसले नितीन पाटील, राम सुरवसे, संजय माने आदी उपस्थित होते.