राज्य डॉजबॉल स्पर्धेत धाराशिव येथील संघाचा अग्रक्रम, राज्य डॉजबॉल ज्युनियर मुले, मुली, पुरुष, महिला स्पर्धेचे उद्घाटन

0
48

लोहारा:- छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभाग छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 5 एप्रिल रोजी उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ.संदीप जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पवार अध्यक्ष डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र हे होते. प्रमुख पाहुणे संचालक सिद्धी साखर कारखाना लातुर येथील अविनाश जाधव पाटील, जिल्हाध्यक्ष डॉजबॉल संघटना लातूर येथील प्राचार्य नितीन राठोड, प्रा. एकनाथ साळुंके, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महासचिव डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ अभिजीत दिखत व्हॉलीबॉल कोच एम.एस.एन.आय. एस.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.आर. खैरनार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. प्राध्यापक रमेश शिंदे सहसचिव राज्य संघटना, संगम डंगर, उपाध्यक्ष महेंद्र कुमार मोटघरे उपाध्यक्ष राज्य संघटना, असद शेख पी.एस.आय , सचिव लातूर जिल्हा, महंमंदरफी शेख जिल्हा सचिव धाराशिव, कल्पेश चौधरी सहसचिव जळगाव, अनिकेत नैताम, गणपत पवार उपाध्यक्ष जिल्हा हँडबॉल संघटना छत्रपती संभाजी नगर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ज्युनियर मुले क्रीडा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रायगड, जालना यांनी आपल्या गटांमध्ये साखळी सामन्यात अग्रक्रम प्राप्त केले आहे. जुनिअर मुली छत्रपती संभाजीनगर नाशिक क्रिडा, ॲकॅडमी रायगड, धाराशिव यांनी आपापल्या गटात अग्रक्रम प्राप्त केला आहे. पुरुष गट नाशिक अकॅडमी छत्रपती संभाजीनगर जालना, रायगड या संघाने आपापल्या गटामध्ये अग्रक्रम प्राप्त केला आहे. महिला गट छत्रपती संभाजीनगर, रायगड, लातूर, धाराशिव यांनी आपापल्या जिल्ह्यात अग्रक्रम प्राप्त केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील दोन मुलांचा व दोन मुलींचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेकरिता स्पर्धा संयोजन सचिव अभिजीत एकनाथ साळुंके, वजीर शेख, आदिनाथ गोरे, धनराज तेलंग, फैय्याज शेख यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता यांनी पुढाकार घेतला. या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा, शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा, शिवशक्ती विद्यालय एकुरगा यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here