उमरगा :- तालुक्यातील साधारण 80 ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची मुदत येणा-या काही कालावधीत संपत असल्याने 2025- 2030 या पंचवार्षिक करीता ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2025 ते 2030 या कालावधीसाठी एकुण 80 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यासाठी उमरगा चे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 रोजी 11.00 वाजता अंतू-बळी पतंगे सांस्कृतीक सभागृहात आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायत परीसरात यासंदर्भात माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता गावात दवंडी देवून गावक-यांना माहिती देण्यात यावी अशा सूचना ग्रामसेवक यांना दि.9 रोजी काढलेल्या सुचनापत्राच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती तहसिलदार गोविंद येरमे यांनी दिली आहे.उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2025 ते 2030 या कालावधीसाठी एकुण 80 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यासाठी उमरगाचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 एप्रिल रोजी 11.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये जातीनिहाय अनुसूचित जाती प्रवर्ग : १३, अनुसूचित जमाती प्रवर्ग : २, इतर मागास प्रवर्ग प्रवर्ग : २१, सर्वसाधारण प्रवर्ग : ४४, एकूण ग्रामपंचायती : ८० असे सरपंच पदाचे आरक्षण असणार आहे.त्याअनुषंगाने ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत दवंडी देऊन, तसेच ग्राम पंचायत/ग्रूप ग्रामपंचात कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्दी करुन दिनांक 16 एप्रिल रोजी 11.00 वाजता अंतू बळी पतंगे सांस्कृतीक सभागृह, येथे तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येत उपस्थीत रहावे असे आवाहन तहसिलदार गोविंद येरमे यांनी तालुकावाशीयांना केले आहे.
Home ताज्या बातम्या उमरगा तालुक्यातील 80 ग्रामपंचायत च्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 16 एप्रिल रोजी