नगरसेविका आरती कोरे यांच्या माध्यमातून असंघटीत कामगारासाठी ई– श्रम कार्ड काढण्यासाठी शिबिर 

0
70

 

लोहारा :-  शहर व परिसरातील सर्व असंघटीत कामगांरासाठी ई–श्रम कार्ड काढण्यासाठी लोहारा शहरात जिल्हा कामगार कार्यालय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दि.10 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत हे कॅम्प सुरु राहणार आहे. तरी लोहारा शहर व परिसरातील सर्व असंघटीत कामगांरासाठी ई–श्रम कार्ड काढण्यासाठी सुरळीत व जास्तीत जास्त कामगांराच्या नोंदी व्हाव्यात या उद्देशाने सामाजिक भावना जपत शहरातील युवा नेते ओम कोरे व नगरसेविका आरती ओम कोरे यांनी हि सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या कॅम्पच्या माध्यमातून मजुर, खाजगी नौकरी करणारे, डॉयव्हर, टेलर, फळ विक्रेते, शेतमजूर, डिलव्हरीबॉय, बांधकाम कामगार, रोजगार करणारे सर्व असंघटीत कामगार यांना ई–श्रम कार्ड मिळणार आहे. तरी या शिबिराचा शहरातील व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहान ओम कोरे व नगरसेविका आरती कोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here