उमरगा : येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूलच्या संघाने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील क्रीडा संकुलात पाच व सहा एप्रिल रोजी झालेल्या राज्यस्तरीय डॉट बॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल मधील 17 वर्षे वयोगटातील मुलांचा व मुलींच्या दोन संघाने सहभाग नोंदवला होता धाराशिव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन चे सचिव व उमरगा तालुक्यातील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील श्रुती जाधव, प्रमिला जाधव या खेळाडूंनी डॉजबॉल राज्यस्तर पंच परीक्षेत सहभाग घेऊन यश संपादन केले.डॉजबॉल राज्य स्पर्धेत सहभागी खेळाडू श्रेयशी शिंदे, अफसाना नदाफ, मोहिनी घोडके, आलिया बागवान, श्रुती जाधव ,अनोखी एरंडे,अस्मिता भोसले, प्रमिला जाधव, श्रावणी कोळी, समृद्धी रणदिवे, सुदर्शन शिंदे, आदित्य सगर, दुर्गेश दुबे,आर्शियांन शेख, पृथ्वीराज पालमपल्ले, अशोक वजनम, अंकुश निंगदळे, इस्माईल नदाफ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यशस्वी विद्यार्थ्यांना कोच धनराज तेलंग व महेम्मद फजल शेख, वजीर शेख व आदिनाथ गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकुंतला मोरे अमर वरवडे शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे पाटील अशोक पतगे सुजाता मोरे व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले
Home आरोग्य व शिक्षण उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत व राज्य पंच परीक्षेत यश