लोहारा :- तालुक्यातील उंडरगाव येथील राजेंद्र धनराज माने हे 22 वर्षे देशसेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा साई ग्रुप व ग्रामस्थांच्यावतीने सहपरिवार सत्कार करण्यात आला. घरात पुर्वी पासुनच देशसेवा करण्याची परंपरा आहे. वडील धनराज माने हे ही सेवानिवृत्त सैनिक आहेत. त्यांचाच वसा घेवून राजेंद्र माने यांनी ही सन 2003 मध्ये सैनिक सेवेत दाखल झाले होते. 2025 मध्ये सेवानिवृत्त होवून 22 वर्षे देशसेवा करुन ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल राजेंद्र माने, वडील धनराज माने, आई सोयराबाई माने, पत्नी रेश्मा माने आणि मुलगी रिया माने असा सहपरिवार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालाजी रवळे, आण्णा गंगणे, शिवाजी सुर्यवंशी, अमोल पाटील, नृसिंह सुर्यवंशी, संतोष काटे, युवराज तोडकरी, राजेंद्र सुर्यवंशी, बाबासाहेब पाटील, बालाजी गंगणे, बाबासाहेब सुर्यवंशी, गोविंद पवार, प्रदिप ढोबळे, गुणवंत सुर्यवंशी, प्रमोद भोसले, गोविंद सुर्यवंशी, रसुल शेख, विश्वास ढोबळे ग्रामसेवक देडे मॅडम, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.