भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने “बोधिसत्व धम्म ज्ञान” स्पर्धा संपन्न

0
56

 

लोहारा:-  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने “बोधिसत्व धम्म ज्ञान” स्पर्धा घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. हायस्कूल लोहारा येथे रविवारी दि.13 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान ही स्पर्धा संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार राज्य स्तरीय बोधिसत्व धम्मज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या लोहारा तालुका शाखेच्या वतीने हायस्कूल लोहारा येथे परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत पाचवी ते सातवी गटातील 20 व मोठ्या गटातील 20 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी तानाजी माटे यांनी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. तर जिल्हा संघटक सुधाकर गायकवाड व तालुका सरचिटणीस दीपक सोनकांबळे यांनी पर्यवेक्षकाचे काम पाहिले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष प्रा.डॉ.विनोद आचार्य, संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब खरोसे, जिल्हा संघटक रत्नदीप मस्के, संरक्षण उपाध्यक्ष प्रशांत भंडारे, संरक्षण सचिव अंकुश भंडारे, पर्यटन सचिव आम्रपाली गोतसुर्वे, महीला सचिव सिताताई सोनवणे, रमाबाई गायकवाड, समता सैनिक दलाचे जवान आर्यन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे जवान यांनी परिश्रम घेतले. परीक्षार्थींचे प्रा.सुधाकर गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here