उमरगा/ : – भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने दि 14 एप्रिल सोमवारी जयंती उत्सव कमिटी जकेकूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान ही काळाची गरज आहे . रक्ताचा साठा नेहमी कमी असल्याचे दिसुन येते . रूग्नांना वेळेवर रक्ताचा पुरवठा होत नाही त्यामूळे कित्येक रूग्णांना आपला जीव गमवावा लागतो . त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने कमिटीच्या वतीने तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते . त्याला जकेकूर वाशीयांनी उत्तम प्रतिसाद दिला . सर्वसामान्य , गरजू लोकांना याचा फायदा मिळावा या अनुशंगाने बाबासाहेबांच्या जयंतीचे दिनाचे औचित्य साधून या शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी शिबिरात 25 दात्यांनी रक्तदान केल. सकाळच्या सत्रात त्रिसरण पंचशील घेत बाबासाहेबांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी छ. शिक्षण संस्था उमरगा चे सचिव शहाजी पाटील, सरपंच अनिल बिराजदार, उपसरपंच हरिभाऊ बिराजदार, ग्रामसेवक श्रीकांत माने सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी शिबिरास श्रीकृष्ण रक्त पेढी उमरगाचे तंत्रज्ञ आपल्या संच्यासाह उपस्थित होते. हस्ते पूजन करून झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी छ. शिक्षण संस्था उमरगा चे सचिव शहाजी पाटील, सरपंच अनिल बिराजदार, उपसरपंच हरिभाऊ बिराजदार, ग्रामसेवक श्रीकांत माने सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी शिबिरास श्रीकृष्ण रक्त पेढी उमरगाचे तंत्रज्ञ आपल्या संच्यासाह उपस्थित होते.


