उमरगा :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९:०० वाजता महाविद्यालयातील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. संजय अस्वले सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. संजय अस्वले सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विचारांवरती प्रकाश टाकला.त्यांनी मांडलेल्या आर्थिक प्रश्नाचा दूरदर्शीपणा महत्त्वाचा असून आजच्या ही अनेक प्रश्नांची उकल त्यामधून होते असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.तसेच डॉ. बाबासाहेबा पासून आपण सर्वनीं संशोधनाची प्रेरणा घेऊन सतत कार्य करावे असे आव्हान याप्रसंगी त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी डॉ. विनोद देवकर , डॉ. वसंत हिस्सल, डॉ.पी एस माने, डॉ.पार्वती सावंत व इतर प्राध्यापक ,शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले उपस्थितांचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.मुरलीधर जाधव यांनी मांडले.


