नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करण्यासाठी अभय योजना राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता — आ.अभिमन्यु पवार

0
32

लोहारा :- 12 मार्च, 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे “क” वर्ग नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासाठी “100% थकीत करभरणा केल्यास 100% शास्ती कर माफ” करणारी योजना राबविण्याची विनंती आ. अभिमन्यु पवार यांनी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तपासून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांना दिल्या होत्या. आ.अभिमन्यु पवार बोलताना म्हणाले कि, सांगताना मला आनंद होत, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत “महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करून राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करण्यासाठी अभय योजना राबविण्यास” मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे. कोरोनामुळे व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे मालमत्ता कर थकले होते, त्या नागरिकांना तर या निर्णयाचा फायदा होणारच आहे पण नगरपालिकांची थकलेली कर वसुली सुद्धा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here