भाजपा संघटन पर्व अंतर्गत मंडल व सक्रिय सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न

0
130

लोहारा:- ‘भाजपा संघटन पर्व’ अभियानांतर्गत महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणीचे ध्येय पूर्ण झाले असून आता ‘भाजपा महाराष्ट्र प्रदेश’ यांच्या वतीने महत्त्वाच्या संघटनात्मक उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मंडल व सक्रिय सदस्य नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष मा.आ. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.संजय केणेकर, आ.विक्रांत पाटील, मा. माधवीताई नाईक, मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजयजी कौडगे तसेच भाजपा नेते मा.आ सुजितसिंहजी ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी आ.बसवराज पाटील, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अँड. मिलिंद पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here