उमरगा :- मोर्चात का गेलास म्हणून जीवे मारण्याची धमकी माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांना दिल्याने दोन जणांविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, गोविंद दडगुले यांच्यावर खूनाचा प्रयत्न झाल्याने सर्व पक्षाच्या वतीने सोमवारी शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा राग मनात धरून गैर अर्जदार व्यंकट इराप्पा धोत्रे व एका अनोळखी इसमाने इंडियन ऑइल पेट्रोल पंप राजधानी हायवे सर्विसेस येथे दि.21 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तू मोर्चात का गेलास तुमच्यामुळे माझा भाऊ दुर्गापा यास गुन्ह्यात आरोपी केले आहेस त्यास तू जबाबदार आहेत तू व तुझे मुले इथेच राहतात मी उमरगा शहराचा दादा असून तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची तक्रार अब्दुल रज्जाक अत्तार (वय 61) राहणार हमीद नगर यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याबाबत अत्तार यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध कलम 115/2 352, 351अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.