वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  बुद्ध भीम गीताचा विद्रोही आंबेडकरी जलसा गुरुवारी

0
51

उमरगा:-  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत बुद्ध भीम गीताचा विद्रोही आंबेडकरी जलसा गुरुवारी (दि २४) रोजी शहरातील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या निमित्याने आंबेडकरी चळवळीतील पँथर्स हरीश डावरे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.के. डी.शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्रमुख शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. शेंडगे आहेत तर उद्घाटक म्हणून तहसीलदार गोविंद येरमे, असून स्वागताध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते सयोजक रामभाऊ गायकवाड आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती हरीश डावरे, रमेश गायकवाड, अमोल लांडगे, अंकुश मुदगडकर, अस्लम शेख, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, कैलास शिंदे, अमोल लांडगे, मल्लीनाथ मलंग, सतीश सुरवसे, बाबासाहेब जानराव, मिलींद रोकडे, चंद्रशेखर गायकवाड, बसवराज स्वामी, शमशोद्दीन शेख, अनिल बिराजदार, ऍड हिराजी पांढरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी भीम शाहीर मेघाणंद जाधव यांच्या आंबेडकरी जलसा तथा परिवर्तनाचा वादळ वारा हा शाहिरी जलश्याचा भव्य कार्यक्रम आयोजित केला असून तालुक्यातील आंबेडकरी जनतेनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन सयोजक रामभाऊ गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here