वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमरग्यात भिमजल्लोष 

0
106

उमरगा :- महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त उमरगा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय कवी व गायक भिमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळ वारा हा बुध्द्ध भिम गिताचा विद्रोही आंबेडकरी जलसा कार्यक्रम दि 24 एप्रिल रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात उमरगा-लोहारा तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने रात्री उशिरा पर्यंत उपस्थित होते.  सोहळ्यात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते हारिषजी डावरे यांचा ७५ वा आमृत महोत्सवानिमित्त भव्य सत्कार मान्यवरांच्या हस्थे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ, आर. डी. शेंडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा प्रभारी ऍड.रमेश गायकवाड,माजी जि.प. सदस्य कैलास शिंदे,मिलींद रोकडे,डॉ स्नेहा सोनकाटे,स्वप्नील जवळगेकर,डॉ. चंद्रशेखर गायकवाड,अॅड. हिराजी पांढरे, युवराज जोगे यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिराज काझी, दगडु भोसले,शहाजी मस्के, श्रीधर सरपे, नेताजी गायकवाड, रमेश ढवळे, मिलींद कांबळे, शरद कांबळे, तिप्पा बनसोडे,संतोष सुरवसे, बिभिषण कांबळे,उमाजी गायकवाड,किरण ढवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.  कार्यक्रमात बहारदार सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड यांनी केले.डॉ आर डी शेंडगे, डॉ स्नेहा सोनकाटे यांनी डॉ बाबासाहेबांच्या जिवन चरित्र, त्यांचे त्याग आणि देशासाठी दिलेले बहुमोल योगदान यावर प्रकाश टाकत उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.दरम्यान कु प्रांजल रामभाऊ गायकवाड या इयत्ता सहावी वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीने डॉ बाबासाहेबांवर केलेल्या आपल्या वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here