मठाधीपती ह.भ.प.श्री.तुकाराम भारती महाराज यांच्या काल्याच्या किर्तनास भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती

0
39

 

लोहारा :- स्वानंद सुखनिवासी सदगुरू भारती बाबा संजीवन समाधी उत्सवानिमित्त परंडा तालुक्यातील जेकटेवाडी (शिवाजीनगर) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता झाली. याप्रसंगी मठाधीपती ह. भ.प.श्री.तुकाराम भारती महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाचा भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून लाभ घेतला. यावेळी महाराजांच्या हस्ते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह यांच्या सहकार्यांचा शाल, श्रीफळ, टोपी व पुष्पहाररूपी प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, भाजपा माध्यम विभाग तालुका प्रमुख निशीकांत क्षिरसागर, चिंचपूर बु. चे सरपंच महेश देवकर, मा.सरपंच काकासाहेब शिंदे, मा.पंचायत समिती सदस्य सतीश देवकर, देवगाव बु.चे सरपंच दत्ता ठाकरे, ब्रम्हदेव उपासे, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here