जेवळी येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेला सुरवात 

0
80

 

लोहारा :-  तालुक्यातील जेवळी येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेला दि.27 एप्रिल रोजी सुरवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ठिक – ठिकाणाहून आलेल्या बाल कलाकारांनी विविध गीतांवर आपल्या नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण करित उपस्थित प्रेक्षकांची दादा मिळवली. जेवळी येथे परंपरेने ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. यानिमित्त यात्रा समितीच्या वतिने गेले आठरा वर्षापासून राज्यस्तरीय खोल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या तीन दिवशीय राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेला (दि.२७) रोजी येथील बाजार मैदानावरील बसव मंचावर सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशीच्या बालगट वैयक्तिक नृत्य व बाल समुह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सरपंच महानंदा पणुरे यांच्या हस्ते पार पडले.

 

यावेळी अध्यक्षस्थानी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकर हे होते. यावेळी प्राचार्य वाय.एस.भोसले, मुख्याध्यापक दयानंद भुजबळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी माळी, डॉ.संतोष ढोबळे, डॉ.सिद्धेश्वर मुळे, पत्रकार सुधीर कोरे, यात्रा समितीचे अध्यक्ष बसवराज कारभारी, उपाध्यक्ष महादेव मोघे, सचिव मल्लिनाथ डिग्गे, पोलीस पाटील धनराज हावळे, अनिल भैरप्पा, महेश दरेकर, गुंडाप्पा कारभारी, बाळासाहेब कटारे, सुभाष सारणे, महादेव सारणे, कल्लाप्पा कारभारी आदिंची उपस्थिती होती. यावेळी बालगटातील वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धात बालकलाकारांनी लोकगीत, लावणी, आदिवासी, देशभक्तीपर गीतासह विविध चित्रपट गाण्यावर बहारदार नृत्य सादर करुण प्रेक्षेकांना खिळवून ठेवले. या तीन दिवसीय नृत्य स्पर्धेसाठी सुत्रसंचलन शिवशरण कारभारी तर परीक्षक म्हणून सतीश माळी (जळकोट), ज्योती पाटील (उमरगा) रोहित पायमल (उमरगा) यांनी काम पहात आहेत. या पहिल्या दिवशीच्या नृत्य स्पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी बाल गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा, प्रथम पारितोषक- कार्तिक लेणे (बीड), द्वितीय- ईश्वरी इरेकर (हिंगोली), तृतीय- आर्णवी भेंडे (लातूर), तर बालगट समुहनृत्य स्पर्धा, प्रथम पारितोषक- जी बी डान्स ग्रुप (लातूर), द्वितीय ॲसम डान्स अकॅडमी (लातूर) तृतीय पारितोषिक शिवकन्या डान्स ग्रुप (अलिबाग) यांनी पटकावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here