उमरगा पोलीस कार्यक्षेत्रातील एकास धाराशिव जिल्ह्यातून तडीपार 

0
654

उमरगा:- येथील पोलीस कार्यक्षेत्रात गंभीर गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांस 01 वर्षा करीता  धाराशिव जिल्हयातुन तडीपार करण्यात आले असल्याची माहीती दि. 30 एप्रिल रोजी उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

 

 

उमरगा पोलीस कार्यक्षेत्रातील प्रशांत अशोक पुरातले वय 25 वर्षे रा. काळे प्लॉट उमरगा हा त्याच्या साथीदारासह उमरगा शहरातील तसेच आजु बाजुच्या खेडयातील लोकासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण, तक्रारी करून स्वतःचे वर्चस्व व लोकांच्या मनात त्याची जरब बसाबी म्हणुन त्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, प्रसंगी घातक शस्त्राचा वापर करून जिवे ठार मारणे, महिला व मुलींचे विनयभंग करणे अशा प्रकारचे कृत्ये वारंवार करीत असल्याने व त्यांना यापुर्वी खुन, विनयभंग करणे, दुखापत करणे तसेच धार्मिक भावना भडकाविणे यासारखे गंभीर गुन्हयात अटक करून देखील त्याचे गुन्हेगारी कृत्यामध्ये कांहीएक फरक न पडता तो परत अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याने त्याच्या अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यामुळे उमरगा शहरातील तसेच आजुबाजुच्या खेडयातील सर्व सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्याच्या सततच्या दहशतीमुळे त्याचे विरूध्द कोणीही नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. इतकी भिती नागरिकांमध्ये बसली होती. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनांतुन पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले समाजासाठी धोकादायक असणारा प्रशांत अशोक पुरातले वय 25 वर्षे रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा यास तडीपार करण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी उमरगा यांचेकडे सविस्तर प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार उमरगा चे उपविभागीय दंडाधिकारी गणेश पवार यांनी सदर प्रकरणात चौकशी करून प्रशांत अशोक पुरातले वय 25 वर्षे रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यास 01 वर्ष कालावधीसाठी धाराशिव जिल्हयाच्या स्थलसिमेतुन हद्दपार करण्याचे आदेश देवुन तसे आदेश पोलीस ठाणे उमरगा येथे प्राप्त झाल्याने दि. 28/04/2025 रोजी नमुद इसमास ताब्यात घेवुन त्यास धाराशिव जिल्हयाचे स्थलसिमेतुन तडीपार करून लातुर येथे सोडण्यात आले आहे.नागरीकांना आवाहन करण्यात येते की, तडीपार व्यक्ती प्रशांत अशोक पुरातले हा धाराशिव जिल्हयाचे स्थलसिमेत तसेच उमरगा पोलीस ठाणेच्या हद्दीत प्रवेश केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाणे उमरगा येथे कळविण्यात यावे. तसेच नागरीकांनी गावगुंडाचे होणारे त्रासाबाबत सदर गावगुंडाना न भिता तात्काळ पोलीस ठाणे येथे तक्रार दयावे. असे आवाहन उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here