उमरगा :- तालुक्यातील मुरुम येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलने दि.29 व 30 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या दांडपट्टा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 5 सुवर्ण, रौप्य पदकाची कमाई केली आहे. तसेच धाराशिव जिल्हा संघाने सांघिक ग्रुप मधून मधून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
पहिली दांडपट्टा स्पोर्टस राष्ट्रीय अजिंक्य पद क्रीडा स्पर्धा मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल पंचवटी नाशिक, महाराष्ट्र 29 व 30 एप्रिल 2025 आयोजित स्पर्धेत गुरुकुल प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल मुरूम येथील यशस्वी खेळाडू मुक्त शैली या क्रिडाप्रकारात देवांश राहुल चिलोबा वय 5वर्ष, 2 सुवर्ण पदक जिंकले, तेजस्विनी स्वप्नील पाटील वय 6 वर्ष रौप्य पदक, राजवीर बळीराम चौधरी वय 7 वर्ष 2 सुवर्ण पदक जिंकले,लाव्या नागनाथ वाघमारे वय 8वर्ष सुवर्णपदक जिंकले, प्रत्यूषा प्रवीण सोमवंशी वय 9वर्ष सुवर्णपदक,गोविंद व्यंकट रूपनूर वय 10 वर्ष सुवर्णपदक यांनी प्राप्त केले व तसेच डॉक्टर रामानुजन इंग्लिश स्कूल उमरगा येथील यशस्वी खेळाडू मुक्त शैली या क्रीडा प्रकारात आराध्या प्रभाकर जाधव वय 8 वर्ष सुवर्णपदक,रमण राहुल सैनी वय 11 सुवर्णपदक ,आयुष युवराज पवार वय 11वर्ष सुवर्णपदक, साहिल मोहम्मद रफी शेख वय 14 वर्ष 2 सुवर्णपदक यांनी प्राप्त केलं. कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा येथील यशस्वी खेळाडू मुक्तशैली या क्रीडा प्रकारात आदित्य अविनाश साळी वय 11 रौप्य पदक प्राप्त केले व माऊली इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल उमरगा येथील मुक्ताशैली या क्रीडाप्रकारात अनुज विक्रम सूर्यवंशी वय 11 वर्ष सुवर्णपदक प्राप्त केले. मेहबूब पठाण यांनी खुला गट मुक्तशैली या क्रिडाप्रकारात रौप्यपदक प्राप्त केले.या सर्व यशस्वी खेळाडूंचा महागुरू सुभाष मोहिते,दांडपट्टा इंडिया चे अध्यक्ष संभाजी अहिरराव , सचिव अजय शहा धाराशिव जिल्हा दांडपट्टा अध्यक्ष डॉ. प्रीती चिलोबा, गुरुकुल स्कूल च्या मुख्याध्यापिका मयुरी चौधरी, टीम मॅनेजर वजीर शेख, निर्देशक (पंच)आदिनाथ गोरे ,मार्गदर्शक महम्मद रफी शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल सर्व पालकांकडून कौतुक होत आहे.