सुपतगाव येथे महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निम्मित बैलांची मिरवणूक

0
127

उमरगा :- तालुक्यातील सुपतगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती निम्मित हनुमान चौकात पुजन करुन अभिवादन करण्यात आले.दुपारी 4वाजता सालाबाद प्रमाणे गावातील अनेक पशुधन व बैलजोड्यांची गावाततून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून उत्कृष्ट पशूंना पारितोषिके देण्यात आली. चार वाजता पशु पालकानी आणलेल्या बैलजोड्यांची गावातील मुख्यरस्त्यावरुन सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या पशुंना बैलपोळा प्रमाणे मोठ्या प्रमाणात सजविण्या आले होते. यावेळी उत्कृष्ट पशुंच्या पालकाना उत्कृष्ठ सजावट पारितोषिके देण्यात आले आहे. उत्कृष्ट बैलजोडी सजावट नावे अशी – बैल जोडीः प्रथम- आदिनाथ लामजने , द्वितीय- सुधाकर हेंडले , तृतीय -उमाकांत करके, चतुर्थ-चिदानंद लामजने या सर्वांना उपसरपंच नागनाथ हेंडले,महादेव भोईटे, हणमंत लामजने, नागनाथ करके यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पांचाळ, गावातील ग्रामस्थ,जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या पारितोषिक प्राप्त पशुंचे पशुपालकाकडून मंदिरापासुन आपल्या घरापर्यंत हलग्याच्या कडकडाट, गुलालाची उदळन करीत मिरवणूक काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here