उमरगा :- बालविकास प्राथमिक विद्यामंदिर उमरगा येथे दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कावळे तर ध्वजारोहण माजी सैनिक पांडुरंग काळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार सोनकवडे सर व दिलीप कुलकर्णी सर उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी सर यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या श्रेया नागनाथ भोरे व समीक्षा गोविंद लामतुरे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती श्रद्धा पुजारी यांनी केले तर आभार आकाश कटकधोंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मोनिका नदीवाडे, अश्विनी जोशी, पल्लवी मुटले, शबाना मुल्ला, शिक्षक अक्षय राठोड यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.