उमरगा तहसील कार्यालयास जिल्हाधिकारी यांची भेट, विविध विकास कामाचा आढावा बैठक 

0
292

उमरगा :- धाराशिव चे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी उमरगा तहसील कार्यालय येथे दि.2 मे रोजी विविध विकास कामासंदर्भात आढावा बैठक घेवून, विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उमरगा- लोहारा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, जिल्हा जिल्हा पुनर्वसन अधिकारी गायकवाड,उप विभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

उमरगा तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी भेट देवून सर्व तालुकास्तरीय अधिकारी यांची बैठक घेऊन उमरगा लोहारा तालुक्यातील भुकंप पुनर्वसित गावांसाठी पायाभूत सुविधांचा आढावा घेतला, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाख रुपये मदतीच्या धनादेश वितरित करण्यात आला.शहरातील आदर्श नागरी सुविधा सीएससी केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.यानंतर तालुक्यातील सुपतगाव येथे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अंतर्गत गाळ उपसा कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला, तसेच सुपतगाव येथील दोन रस्ते मजबुतीकरणासाठी अभिसरणातून तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ व जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अधिकारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here