जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा 7 वी बॅच 1992-93 व हायस्कुल लोहारा 10 वी बॅच 1995-96 यांच्या वतीने स्नेह मेळावा संपन्न

0
349

 

लोहारा:- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा 7 वी बॅच 1992-93 व हायस्कुल लोहारा 10 वी बॅच 1995-96 यांच्या वतीने स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये सर्व गुरुवर्य यांचा यथोचित सत्कार करून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस स्टील काचेची कमान व हायस्कुल लोहारा शाळेस 14 डिजिटल बोर्ड भेट म्हणून सर्व माजी विद्यार्थी यांच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळा व हायस्कुल लोहारा शाळेतील सर्व माजी शिक्षक, विद्यमान मुख्यध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक दिपक मुळे, सचिन पोतदार, शिवलीला जट्टे, सुवर्ण खुणे, शैला गोरे, रिजवना हेड्डे, सुनंदा वकील, सतिश गिरी, अंकुश बंडगर, संतोष क्षीरसागर, शीतल घोंगडे, व सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here