उमरगा :- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे दि. 5 मे रोजी सकाळी योग मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा भारत केंद्रीय प्रभारी पुज्य स्वामी आदित्य देवजी महाराज, पुज्य स्वामी सनातन देवजी महाराज, महाराष्ट्र राज्य युवा प्रभारी अतुलजी आर्य तसेच भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी व्यंकट जवळगे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी पुज्य स्वामी अदित्य देवजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना योग व आपल्या जीवनातील सकारात्मक बदल याबद्दल सखोल माहिती दिली. योगाने शरीर तर निरोगी राहतेच त्याबरोबर मन प्रसन्न राहण्यास मदत होते. शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. बलशाली भारत बनवायचा असेल तर योग व प्राणायामाची कास धरणे गरजेचे आहे. युवक देशाची ताकत आहेत. युवकांनी व्यसनापासून दूर रहावे. सामाजिक कार्यात सक्रिय राहावे. एकमेकांना सहकार्य करण्याची भावना असावी. जीवनात यशस्वी होण्याबरोबर आरोग्य उत्तम राखणे गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील,प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख, प्रा.औदुंबर जाधवर, प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीछोडे, प्रा.निलोफर शेख, प्रा. मोनिका धुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्राचार्य महेश कदारे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.