परंडा :- येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास करण्यात यावा, असा आदेश कोर्टाने दिला असुन पोलिसांना तपासाची कागदपत्रे व चार्जशीट देण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात क समरी दाखल केली होती. त्यानंतर पुन्हा तपास करण्यात यावा असा अर्ज दिला होता. त्यावर दि. 6 मे रोजी सुनावणी झाली, कोर्टाने समरी अहवाल रद्द तपासाला परवानगी दिली आहे. भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी या बाबत कांही प्रश्न उपस्थित करीत पुन्हा तपास करावा अशी मागणी केली होती, यांच्या मागणीला यश आले आहे. परंडा गुन्ह्यात प्रयोग शाळा तपासणीत डृग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडले होते. परंडा येथे मोठ्या प्रमाणात डृग्ज तस्करी सुरु असुन बार्शी पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी यात अनेक प्रश्न व मुद्दे उपस्थित करीत गुन्ह्याचा तपास नव्याने करावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. यात माजी आ.ठाकूर यांची भुमिका महत्वाची ठरली आहे. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांना कोर्टातील भुमिका बदलावी लागली. गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्यावरुन सदयच्या गुन्ह्यात अधिकचा पुरावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डृग्ज बाळगणे, विक्री करणे समाज विघातक कृत्य असुन त्यामुळे तरुण वर्ग डृग्जच्या आहारी जावुन गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे. तरी पोलीस ठाणे परंडा गुरनं 10/224 कलम 8 (क), 20 (ब) एनडीपीएस अॅक्टमध्ये पाठविलेल्यामध्ये ‘क’ फायनल मध्ये अधिक तपास करण्याची परवानगी व गुन्ह्याचे कागदपत्र मिळण्याची लेखी विनंती धाराशिव पोलिसांनी कोर्टात केली आहे. पोलीस अधिक्षक संजय जाधव यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी परंडा अतिरिक्त सत्र न्यायालयात पत्र दिले होते. त्यानंतर कोर्टाने आज तपासाचे आदेश दिले. परंडा येथे दि. 19 जानेवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यात 8.33 ग्रॅम डृग्ज जप्त करीत पुणे जिल्ह्यातील मुंडवा येथील इम्रान नसीर शेख याला पनवेल पासिंगची एम एच 46 ए यु 2832 गाडीसह अटक केली होती. तर परंडा शहरातील मुजावर गल्ली येथील अन्वर उर्फ अण्णा जलील अत्तार याला 26 ऑगस्ट 2024 रोजी अटक केली होती. आता पुन्हा तपासात काय निष्पन्न होते हे पहावे लागेल.