कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य

0
23

 

 

उमरगा :- राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने ऍग्री स्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाचा माहिती संच व शेतीचे संदर्भिकृत (जिओ रेफरन्स व लॅंड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रित रित्या तयार करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल अभिलेखातील शेतकऱ्यांची व शेतीची माहिती घेऊन शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रित रित्या शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे.त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत रायबिण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे.शासन निर्णयानुसार दिनांक 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्री स्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून( फार्मर आयडी) शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. उमरगा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील महा ई सेवा केंद्र /आपले सरकार सेवा केंद्र/सीएससी केंद्र येथे जाऊन (ॲग्री स्टॅक) योजनेमध्ये नोंदणी करावी व आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करावा असे आवाहन तहसीलदार उमरगा गोविंद येरमे व तालुका कृषी अधिकारी ,उमरगा डी बी रितापुरे व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उमरगा प्रशांतसिंह मरोड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here