लोहारा :- तुळजापूर विकास आराखड्यास शिखर समितीकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर याविषयी मित्र कार्यालय, मुंबई येथे मित्रचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर चे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विकास आराखड्यातील कामांना गती येण्याच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, धाराशिव जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश आहिरराव, सहाय्यक संचालक श्रीमती जया वाहणे, तहसिलदार अरविंद बोळंगे, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, वास्तुविशारद हेमंत पाटील, तांत्रिक सल्लागार श्रीमती तेजस्वीनी आफळे यांची उपस्थिती होती.