मातोळा पाटीजवळ ऑटो पल्टी ; 6 जण जखमी 

0
426

उमरगा :- तालुक्यातील मातोळा येथील लातुर- उमरगा रोडवर दि. 12 रोजी दुपारी ठीक 12:45 वाजता आळंद येथुन लातुरच्या दिशेने जात असलेला ऑटो क्रमांक KA32 AB 5281 हा मातोळा पाटीजवळ जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो पल्टी झाला त्यात सहा जण जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

 

या अपघातात अर्चना सतीश राठोड, वय- 25 ,दयानंद हमीन राठोड वय -40, सोनाली दयानंद राठोड वय- 30, पुतळाबाई राठोड वय -70 ,रुतीका सतीश राठोड वय 4 वर्ष , रिया सतीश राठोड वय – 2 वर्ष रा. सर्व आळंद, जि. गुलबर्गा हे 6 जण जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले .असल्याची माहीती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here