मुरूम च्या विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नाव कोरावे — डॉ. विठ्ठलराव जाधव

0
41

 

उमरगा : – नाशिक येथे 29 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेत उमरगा तालुक्यातील मुरूम येथील गुरुकुल प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्पर्धेत पाच सुवर्ण पदक व एक रोप्य पदक मिळविले. माजी पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर व देश पातळीवर यशस्वी नाव कोरून दैदिप्यमान कामगिरी केली आहे. यापुढे ही सातत्य ठेवून यशस्वी कामगिरी करतील असे आवाहन केले.शाळेच्या वतीने मुरूम येथे गुरुकुल शाळेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.यावर्षी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम चे राजू मिनिअर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, विठ्ठलराव पाटील, डॉ. राहुल चिलोबा, बोळेगावचे सरपंच विलास पाटील, केसर जवळगाचे माजी सरपंच अमोल पटवारी, गोविंद रुपनुर बोळेगाव यांची उपस्थिती होती.यशस्वी विद्यार्थ्यांना घडवणारे महमदरफी शेख, संस्थेचे सचिव आनंद चौधरी, सदस्य दिवाकर पाटील यांनी सखोल मार्गदर्शन करुन यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मयुरी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. विठ्ठलराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राजु मिनियर यांनच पण मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार अनिता वडतिले यांनी मानले. यावेळी भूषण मडोळी, रियाज नूरसे, पोद्दार, सोभाजी, भाग्यश्री कुंभार यांची उपस्थिती होती. यावेळी माता पालक मोठ्या उत्सहात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here