उमरगा :- भारतीय जनता पार्टीचे नुतन जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी दि.17 मे रोजी शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उमरगा येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित ऍड.नितीन भोसले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, भाजपाचे युवा नेते हर्षवर्धन चालुक्य, अजित दादा पिंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, भाजपाचे माधव पवार, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, संदिप चौगुले, शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर सूर्यवंशी, बालाजी चव्हाण, मोहन जेवळीकर, आदी मान्यवर उपस्थित होते.