माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते औराद (गु.)येथील समाजमंदिराचे लोकार्पण

0
352

उमरगा:- तालुक्यातील औराद (गु.)  येथे तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व समाजमंदिर लोकार्पण सोहळा दि. 18 मे रोजी उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला.

रविवार दि.१८ मे  रोजी उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडुन बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे लोकार्पण माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी माजी आमदार चौगुले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२३-२४ अंतर्गत सुमारे १५ लक्ष रू. निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतुन हे काम पुर्णत्वास आलेले आहे. या प्रसंगी भन्ते डॉ.भिख्कु उपगुप्त महाथेरो (पुर्णा), भन्ते अमरजीत यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली.  कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, माजी समाजकल्याण सभापती हरिश डावरे,वंचित बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड, धर्मवीर गायकवाड, अर्जुन गायकवाड, चंद्रकांत कांबळे, प्रा.श्रीकांत गायकवाड, डॉ.कमलाकर कांबळे, डी.बी.कांबळे सर, भंते अनिलाचंद पाथरी, नागेश गायकवाड, दयानंद गांजणे, बौध्द विहार समितीचे सर्व सदस्य, बौध्द उपासक, उपासिका व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here