उमरगा :- धाराशिव भारतीय जनता पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी उमरगा तालुक्याच्यावतीने भाजपाचे नेते हर्षवर्धन चालुक्य पाटील व भाजपा उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील सास्तूरकर यांनी भाजपा नुतन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल दादा पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुर्यवंशी, हंसराज गायकवाड, अरुण ईगवे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (लोहारा), तालुका सरचिटणीस सागर पाटील, पंडीत शिंदे, अमर वरवटे, तालुका सरचिटणीस, सागर पाटील, उमेश स्वामी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, मोहन जेवळीकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.