उस्मानाबाद:- येथे वंचित बहुजन आघाडी च्यावतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन दि.20 मे रोजी करण्यात आले होते. मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
दि.20 मे रोजी उस्मानाबाद येथे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते त्याचबरोबर मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रण बागुल, जिल्ह्याचे प्रभारी भोसीकर, उमरगा लोहारा विधानसभेचे उमेदवार रामभाऊ गायकवाड, उस्मानाबाद विधानसभेचे उमेदवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लोखंडे ताई माजी जिल्हाध्यक्ष बि. डी.शिंदे, विद्वत्त सभेचे चंदनशिवे सर विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे संधी देण्याचे आवाहन केले व पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दारांना पक्षात ठेवणार नसल्याचे जाहीर केले.