उमरगा पोलीस विभागाचा भाजपा उमरगा शहर मंडळाच्या वतीने सन्मान व सत्कार

0
346

उमरगा :- येथील पोलीस निरीक्षक कार्यालयाचा सन्मान – 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानात प्रथम क्रमांकाची गौरवशाली कामगिरी.

महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात, छत्रपती संभाजीनगर विभागातून उमरगा पोलीस निरीक्षक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल उमरगा शहरातील पोलीस विभागाचा भाजपा उमरगा शहर मंडळाच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.या यशामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराते, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पुजारवड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सत्कार समारंभात भाजपा उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲड. साईराज टाचले, भाजपा चे ज्येष्ठ नेते डाॅ. कपिल महाजन, तसेच जगदीश जाखोटिया, संतोष वकारे, समर्थ दंडगे, स्वप्नील बदोले, यशवंत कोथींबरे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि उमरग्यासारख्या सीमावर्ती भागातील पोलीस टीमचे कार्य हे सुशासन, शिस्तबद्धता आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here