उमरगा :- उमरगा शहरापासून जवळच असलेल्या मुबंई- हैद्राबाद महामार्गावरील येळी गावा जवळ दिनांक 23 रोजी दुपारी ठीक 1:20 वाजता सोलापूर कडुन उमरग्याकडे येणारी जीप क्रमांक KA06Z7421व उमरग्या कडुन सोलापूर कडे जाणारा आयशर क्रमांक MH05 EL 2984 यांची समोरा समोर धडक होऊन सहा जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
या अपघातात नसरीन नशीर सय्यद वय 35 रा कासारशिर्शी, मुबीना हसन सय्यद वय 50, शमशाद ईसमाल सय्यद वय 40 कासारशिर्शी, सय्यद आमीरसाहेब हुमनाबादे वय 50 देवनाली, नुतबी सय्यद 40 देवनाली, रिजवान फारुक शेख वय 22 राहणार लामजना हे जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले . असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.