लोहारा येथे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
137

लोहारा  :- तहसील कार्यालयातील एका महीला कर्मचाऱ्यास किरकोळ कामावरून अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका तरुणा विरूद्ध शुक्रवारी (दि.२३) लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.२१) दुपारी ४:०० वाजता लोहारा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कामकाज पाहणाऱ्या ऐश्वर्या जितेंद्र जाधव (वय २४, रा .माळेवाडी, ता . आटपाडी, जि. सांगली. हा.मु. तहसील कार्यालय, लोहारा) या नेहमी प्रमाणे बुधवारी (दि.२१) लोहारा तहसील कार्यालयात आपल्या टेबलवर शासकीय कामकाज करीत असताना दरम्यान बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नितीन बालाजी जाधव (रा. मोघा बु. ता. लोहारा) हा तरुण लोहारा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात टेबल जवळ येऊन एकदम मोठ्या आवाजात शामल धनराज माटे (रा. मोघा ता. लोहारा) यांची राशन कार्डची योजना बदलून मिळणे बाबतची फाईल तुमच्या कार्यालयात जमा आहे. त्याचे काय झाले? असे मोठ मोठ्याने विचारत पुरवठा निरीक्षक ऐश्वर्या जाधव यांच्या अंगावर धावून येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. व श्रीमती जाधव यांच्या हातातील फाईल जबरदस्तीने हिसकावून घेतली. व फाईल मधील काही कागदपत्रे काढून घेऊन फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात बळाचा वापर करून अडथळा निर्माण करून फिर्यादी श्रीमती जाधव यांना नायब तहसीलदार नानासाहेब मोरे यांच्या समोर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पुरवठा निरीक्षक ऐश्वर्या जितेंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि.२३) दुपारी १२:०४ वाजण्याच्या सुमारास नितीन जाधव (रा. मोघा बु. ता. लोहारा) यांच्या विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here