अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
145

लोहारा :–  तालुक्यातील एका गावातील (नाव गाव गोपनीय) एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत सतत लैंगिक अत्याचार करून पिडीतेस फूस लावून पळवून घेऊन जात असताना रंगेहाथ मिळून आल्याने एकाविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील एका गावातील (नाव व गाव गोपनीय) एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस जवळीक व तिच्याशी ओळख, प्रेम संबंध निर्माण करुन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत पिडित अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केले. व गुरुवारी (दि.२२) त्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्याचा प्रयत्नात असताना पिडित मुलीच्या कुटुंबीयांनी त्यास रंगेहाथ पकडून लोहारा पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध लोहारा पोलीस गुरनं १६७/२०२५ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहारा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here