” ऑपरेशन सिंदूर “च्या समर्थनार्थ उमरग्यात भव्य तिरंगा यात्रा

0
201

उमरगा : सतत कुरापती करणा-या व काही दिवसापूर्वी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकावर विनाकारण गोळी बार करुन हत्या करणा-या पाकिस्तानी दहशतवादी यांना त्यांच्याच देशात घुसून धडा शिकवण्याकरीता हिंदुस्थानी सैनिकांनी जे “ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून अव्दितीय शौर्य दाखवले त्यांच्या समर्थनार्थ दि.24 रोजी सायंकाळी उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयापासुन हुतात्मा स्मारकापर्यंत तालुक्यातील तमाम राष्ट्रभक्ताच्या वतीने भव्य तिरंगा पद यात्रा काढण्यात आली. ‘तिरंगा आमचा अभियान, भारत आमचा प्राण, ‘ऑपरेशन सिंदुर – भारताच्या अस्मितेचा गौरव, वीर जवानांना मानाचा मुजरा, ‘भारत माता की जय अशा घोषणांनी यात्रेत सहभागी झालेल्या राष्ट्रभक्त यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून गेला होते.

 

आदर्श वरिष्ठ महाविद्यालय येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण (भैय्या) पाटील, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. युवा नेते शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श महाविद्यालयापासुन निघालेली तिरंगा पदयात्रा राष्ट्रीय महामार्गावरून पालिकेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाळासाहेब ठाकरे चौक ते हुतात्मा स्मारकापर्यंत काढण्यात आली. तेथे हुतात्मांच्या स्मृती स्तंभाला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पदयात्रेत माजी सैनिक राजू बेंडकाळे, व्यंकट चौधरी, देविदास व्हनाळे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, उपप्राचार्य डॉ. राम सोलंकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी, उद्योजक अनिल उर्फ पप्पू सगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मुरलिधर मुगळीकर, वीरशैव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ मलंग, उमरगा बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सुनिल कुलकर्णी, दिलीपसिंह गौतम, प्रा. डॉ. शौकत पटेल, ॲड. व्ही. एस. आळंगे, मल्लीनाथ दंडगे, ॲड. बिराजदार, माजी नगरसेवक महेश माशाळकर, विक्रम मस्के, योगेश राठोड, संतोष वकारे, शुभम मुळजकर, भाजपाचे उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲड. साईराज टाचले, श्रीधर ढगे, कपिल कुलकर्णी, राम बोधे यांच्यासह असंख्य राष्ट्रभक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here