लोहारा:- – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती उत्सव समितीची सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी प्रेम लांडगे, उपाध्यक्ष पदी आकाश विरुदे, सचिव पदी प्रदीप घोडके, सहसचिव पदी अमित महानुर, कोषाध्यक्ष पदी श्रीकांत तिगाडे, यांची निवड करण्यात आली. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे, वाघमोडे सर, सुरेश पांढरे, विकास घोडके, बालाजी विरुदे, पं.स. माजी सदस्य सुधीर गोडसे, दगडू तीगाडे, प्रशांत लांडगे, अप्पा देवकर, अंबादास विरुदे, विजय महानुर, महेश वाघे, जयसिंग बंडगर, पांडुरंग घोडके, प्रश्नांत थोरात, अंकुश बंडगर, संदीप घोडके, अनिल विरोधे, कृष्णा वीरुदे, काका घोडके, अजय घोडके, राहुल विरुदे, सुमित महनुर, धवल खताळ, हर्षवर्धन खताळ, नितीन वाघे, शिवा तीगाडे, महेश घोडके, ऋषिकेश तिगाडे, वैभव घोडके, बाळासाहेब घोडके, गोपाळ घोडके, ओमकार लांडगे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात समाज एकतेचा व प्रगतीचा संदेश देण्यात आला व भविष्यात समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली.