उमरगा :– ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडत आपले शौर्य दाखवून दिले. सैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांचा गौरव म्हणुन सोमवार दि.26 मे रोजी उमरगा शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या यात्रेला उमरगा शहरासह तालुक्यातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेत देशभक्तांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम् “, ” अशा घोषणा दिल्या.
यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. या रॅलीमध्ये माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले, डॉ.चंद्रकांत महाजन, रेखाताई सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, मराठवाडा युवती सेना निरीक्षक ॲड. आकांक्षा चौगुले, माजी सभापती दिग्विजय शिंदे, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, भाजपा उमरगा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, शिवसेना शहरप्रमुख योगेश तपसाळे, माजी नगरसेवक संतोष सगर, उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर सुर्यवंशी, अभिमान खराडे, शिवसेना विभाग प्रमुख मनोजकुमार जाधव,बी.के.पवार, संदीप चौगुले, भगत माळी, संदीप चव्हाण, नाना मदनसुरे, युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, शहरप्रमुख अमर शिंदे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख संध्याताई शिंदे, शहरप्रमुख लताताई भोसले, अमोल पाटील, शरद माने, खयुम चाकुरे, लिंगराज स्वामी, पदमाकर पाटील, हरिश डावरे, डॉ.फरीद अत्तार, भगत माळी, सुशील दळगडे, शंतनु सगर, शमशोद्दीन जमादार, माजी सैनिक संघटनेचे प्रकाश रणखांब, व्यंकट चौधरी, ज्ञानेश्वर पवार, किशोर गायकवाड, गोविंद काळे, घनश्याम पाटील, बब्रुवान गायकवाड, राजेंद्र बेंडकाळे, परमेश्वर चौगुले, वाल्मिक भोसले, सत्यभामा घाटे, श्रीमती.सावित्रा पतंगे, यांच्यासह उमरगा शहरासह तालुक्यातील महिला व नागरिक सहभागी झाले होते