- उमरगा : तालुक्यातील एकुरगा व कोरेगाव येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी आढावा बैठक झाली. यावेळी सोयाबीन बियाण्यांच्या बीज प्रक्रियेबाबत मंडळ कृषी अधिकारी दिपक मुळे व कृषी पर्यवेक्षक ढोकळे किरण यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. बियाणे, कीटकनाशक खते खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीन, तूर यांची बीबीएफ पेरणी, त्याचे महत्त्व, सोयाबीन टोकन पेरणीबद्दल कुलकर्णी रोहित यांनी मार्गदर्शन केले व ॲग्री स्टॅग योजने अंतर्गत शेतकरी नोंदणी करण्याचे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले. तेव्हा सरपंच पद्माकर कुनाळे(एकुरगा) महेशशंकर पाटील( पोलिस पाटील एकुरगा),पांडुरंग खटके कोरेगाव उपसरपंच, संजय पाटील माजी सरपंच कोरेगाव तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.