लोहारा :– भाजपाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पत्रकार आणि मित्र परिवाराच्यावतीने एक आगळावेगळा कौतुक सोहळा शहरातील कॉन्फरन्स हॉल येथे दि.28 मे रोजी दुपारी उत्साहात पार पडला. यावेळी नुतन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्यावतीने करण्यात आला. तसेच सह्याद्रि फाऊंडेशन चे संस्थापक डॉ.दिग्गज दापके देशमुख यांनी स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांच्या जिवनावर आधारीत पुस्तक भेट देऊन सत्कार केला. यावेळी शशीकांत करंजकर, अभिजीत शेळके, संपादक चंद्रशेन देशमुख, गजानन पाटील, अदि, उपस्थित होते.