मुरुम :- शहरातील नेहरूनगर परिसरातील लिगाडे प्लॉट येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना अनेक वर्षापूर्वी नळजोडणी देण्यात येऊन देखील पाणीपुरवठा आजपर्यंत एकदाही नळाद्वारे करण्यात आलेले नाही. पाण्याअभावी या भागातील नागरिकांना थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुरूमच्य वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना शुक्रवारी (ता. ३०) रोजी निवेदन देऊन तात्काळ पाणीटंचाई दूर करावी अन्यथा आमरण उपोषणाचा अवलंब करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे . निवेदनात नमूद करण्यात आले की, लिगाडे प्लॉट भागातील मुदकण्णा फ्लोटिंगमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा प्रश्न आहे या भागात सिमेंट रस्ते करण्यापूर्वी वसाहतीतील सर्व नागरिकांना नगरपरिषदकडून पाईपलाईन करत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे परंतु आज तगायत शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या जनवाहिनीची जोडणी या भागातील जलवाहिनीला जोडण्यात आलेली नाही नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदकडे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची जोडणी करून या भागातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी करून देखील नगरपरिषद कडून कोणती उपाय करण्यात आले नाही नळजोडणी करण्यात आलेली पाईपलाईन मुख्य पाईपलाईनशी जोडलेली नसल्याने पाणीपुरवठाचं झाला नाही. तरीदेखील नगर परिषदेकडून हजारो रुपयांची नळपट्टी आकारण्यात आली आहे. हे नागरिकांवर अन्यायकारक असून, भरलेली रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याउलट पाणीपुरवठा न करता या भागातील नागरिकांवर फुकटची लादण्यात आलेली नळपट्टी भरल्यानंतरच घरकुलचा इतर योजनेचा लाभ देण्यात येईल असा जुलमी आदेश नगरपरिषद कडून लावण्यात आलेला आहे अशी तक्रार देखील निवेदनात नोंदवण्यात आली आहे .नगरपरिषदचा चाललेला मनमानी निजामी कारभार हे असंवैधानिक असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने स्पष्ट केले.येत्या पंधरा दिवसात लिगाडे प्लॉट मधील मुदकण्णा वसाहतीतील नळाला पाणीपुरवठा करावे नळाला पाणी सुरू होईपर्यंत नळपट्टीची वसुली थांबवावी व भरलेली रक्कम परत करावी, घरकुल लाभासाठी नळपट्टीची अट रद्द करून योग्य कार्यवाही करावी. अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर बाबा कुरेशी, इमरान सय्यद, लखन भोंडवे, हुसेन तांबोळी, मोहन जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी शिष्टमंडळाच्या स्वरूपात निवेदन सादर केले. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लिगाडे प्लॉट भागात तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून समस्या बाबतीत अहवाल तयार करण्यात येईल. तसेच घरकुल व इतर योजनेसाठी स्थानिक नागरिकांसाठी नळपट्टीची अट रद्द करत असल्याचेही स्पष्ट करून. येत्या चार दिवसात पाणीटंचाई दूर करण्यात येईल असे आश्वासनही दिले या निवेदनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला असून प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Home ताज्या बातम्या लिगाडे प्लॉटमधील पाण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; मुरुम नगर परिषदेला निवेदन...