लोहारा:– तेरणा ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे धाराशिव जिल्हाभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. येरमाळा, नंदगाव, पाडोळी (आ), दहिफळ, काटी, पाटोदा आदी गावामध्ये संपन्न झालेल्या या आरोग्य शिबीरात गाव व परिसरातील सर्व वयोगटातील महिला, पुरुष, बालक असे २८५६ जणांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. शिबिरातील ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहेत त्यांच्यावर तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. तेजस्विनी शर्मा, डॉ.जिनास शेख, डॉ.निरज पवार, डॉ.भारती उके, डॉ.साक्षी केशला यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, स्थानिक कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.
Home आरोग्य व शिक्षण तेरणा ट्रस्टच्या विविध आरोग्य शिबीरात २८५६ पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार