उमरगा नगर परिषदेचे नगर रचनाकार संदीप जाधव यांची औसा येथे बदली

0
368

उमरगा :- येथील नगर परिषद कार्यालयात मागील साडेतीन वर्षांपासून नगररचनाकार या पदावर कार्यरत असलेल्या संदीप जाधव याची औसा नगर परिषद कार्यालयात प्रशासकीय बदली दि 28 मे रोजी झाली असून, दि. ३०मे रोजी कार्यालयातील कर्मचा-याच्या वतीने निरोप समारंभा च्या कार्यक्रमाचे आयोजन नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी हे होते. याप्रसंगी, नगर अभियंता राजन वाघमारे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी विवेक शाहीर, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, सहाय्यक लेखापाल मनोज जंगले, संगणक अभियंता महेश शिंदे, शेषेराव भोसले, मंजूर शेख, इरफान शेख, विशाल माळी, रमेश हजारे, रोखपाल किरण क्षिरसागर, माधव नागराळे, आकाश सरपे, गुरुनाथ कांबळे, सलीम सास्तुरे ,जमादार, आदी कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here